District Institute of Education and Training,Chatrapati Sambhajinagar

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था
छत्रपती संभाजीनगर

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झालेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (एनपीई, १९८६) शिफारशी लक्षात घेऊन, देशभरात जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्था (डीआयईटी) स्थापन करण्यात आली. आतापर्यंत देशातील ५००+ पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये डीआयईटी आहेत. डी.आय.ई.टी. ची स्थापना सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात आली असून शिक्षकांना प्रशिक्षण देणारी जिल्ह्याची शिखर संस्था आहे. आज मितीस जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ही जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे.

Hero Image
Customer 1 Customer 2 Customer 3 Customer 4 Customer 5 12+
आमच्या विषयी अधिक माहिती

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील राबविलेले उपक्रम

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांची इयत्तानिहाय व विषयनिहाय संपादणूक उंचावण्यासाठीचे राबविलेले उपक्रम

  • पर्यवेक्षीय यंत्रणेसाठी PGI उद्बोधन सत्राचे नियोजन व आयोजन-
  • विद्यार्थ्यांची राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील इयत्ता व विषयनिहाय संपादणूक उंचावण्यासाठीची कृतियोजना विकसन व अंमलबजावणी
  • इयत्ता व विषयनिहाय विद्यार्थी संपादणूक उंचावण्यासाठी अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन अनुभव योजना उद्बोधन
  • विद्यार्थ्यांची राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील इयत्ता व विषयनिहाय संपादणूक उंचावण्यासाठीची NAS व अध्ययन निष्पत्ती आधारित प्रश्नपेढी विकसन व सराव
  • इयत्तानिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती आधारित प्रश्न विकसन
  • आनंददायी शनिवार व दप्तरमुक्त शाळा उपक्रम अंमलबजावणी

नवीन उपक्रम

समग्र प्रगती पत्रक पथदर्शी अभ्यास

शिक्षक प्रशिक्षण विशेष

उद्देश :- "शिक्षकांना सक्षम बनवणे, भविष्याला प्रेरणा देणे."

शिक्षण परिषद नियोजन:

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात शिक्षण परिषदा दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी आयोजित करण्यात येतात.

  • पूर्व तयारी –शाळाभेटी , CRG बैठक
  • प्रत्यक्ष शिक्षण परिषद दरम्यान – आढावा,गरजांची निश्चिती, गटात काम आणि नियोजन, सादरीकरण
  • शिक्षण परिषद नंतर – शाळाभेटी, वर्ग निरीक्षण, आवश्यक तिथे शिक्षकांना मदत

प्रशिक्षण कालावधी: ४ ते १० नोव्हेंबर २०२४ (एकूण ७ दिवस) [५० घड्याळी तास]

शैक्षणिक तत्त्वज्ञान आणि धोरणे समजून घेणे – राष्ट्रीय आणि राज्य शिक्षण धोरणे, तसेच समकालीन शिक्षणतत्त्वे आत्मसात करणे.

  • अपेक्षित प्रशिक्षणार्थी संख्या: ६५५
  • प्रत्यक्ष उपस्थित संख्या: ५८०

जिल्हास्तर प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (ToT)

तालुकास्तर प्रशिक्षण : दि. १० फेब्रु. ते ०८ मार्च, २०२५ या कालावधीत शासकीय आणि अनुदानित शाळांमधील इ.१ ली ते ५ वी तसेच इ.६ वी ते ८ वी आणि इ.९ वी ते १२ वी इयत्तांना शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी आणि पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांसाठी नियोजित आहे.

विविध विभाग

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंतर्गत विभाग

प्रशासन, नियोजन आणि व्यवस्थापन विभाग

✅ प्रशासन: शालेय/संस्थेच्या नियमांची अंमलबजावणी, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन, शिस्त आणि गुणवत्ता नियंत्रण.
✅ नियोजन: शैक्षणिक आणि भौतिक संसाधनांचे नियोजन, अभ्यासक्रम आणि उपक्रमांचे आयोजन, शिक्षक प्रशिक्षण आणि प्रगतीसाठी उपाययोजना.
✅ व्यवस्थापन: वित्तीय नियोजन, संसाधनांचे योग्य वितरण, कर्मचारी मूल्यांकन, पालक व समाजसंवाद आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर.
➡️ हा विभाग संस्थेच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतो व शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत करतो. 🚀

अभ्यासक्रम विकास आणि मूल्यांकन विभाग

✅ अभ्यासक्रम विकास: आधुनिक शिक्षणतत्त्वांनुसार अभ्यासक्रमाची रचना, सुधारणा आणि अध्यापन तंत्रांचा विकास.
✅ मूल्यांकन: विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मूल्यमापन, परीक्षा प्रणाली, निकाल विश्लेषण आणि सुधारणा उपाययोजना.
➡️ उद्दिष्ट: गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रभावी मूल्यमापन सुनिश्चित करणे. 🎯

माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान आणि अनौपचारिक शिक्षण विभाग

✅ ICT: डिजिटल शिक्षण, ई-लर्निंग, स्मार्ट क्लासरूम आणि तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन.
✅ अनौपचारिक शिक्षण: शाळाबाह्य शिक्षण, जीवन कौशल्य विकास, ऑनलाइन कोर्सेस आणि अनुभवाधारित शिक्षण.
➡️ उद्दिष्ट: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण प्रभावी बनवणे आणि व्यावहारिक ज्ञान वाढवणे. 🚀

सेवापूर्व आणि सेवांतर्गत प्रशिक्षण विभाग

✅ सेवापूर्व प्रशिक्षण: नव्या शिक्षकांसाठी आवश्यक ज्ञान, अध्यापन तंत्रे आणि शैक्षणिक कौशल्ये विकसित करणे.
✅ सेवांतर्गत प्रशिक्षण: कार्यरत शिक्षकांचे कौशल्यविकास, नवे अध्यापन तंत्र आणि तंत्रज्ञान प्रशिक्षण.
➡️ उद्दिष्ट: गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांना सक्षम करणे आणि त्यांची कार्यक्षमता वाढवणे. 🎯

Read More

संपर्क

संपर्क माहिती

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर

पत्र व्यवहारासाठी पत्ता

पदमपुरा , रेल्वे स्टेशन जवळ,

छत्रपती संभाजीनगर ४३१ ००१

Phone Number

+1 5589 55488 55

+1 6678 254445 41

Email Address

dietcsn1@gmail.com

संपर्कात रहा

कृपया आपले म्हणणे थोडक्यात सांगा.

Loading
Your message has been sent. Thank you!